डेरवण येथील वालावलकर रूग्णालयामध्ये असणाया बालरोगतज्ज्ञ विभागाने शर्थीचे प्रयत्न करीत एका नवजात बाळाचे प्राण वाचवले आहे. सातारा जिल्ह्रातील एक महिला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आली होती. प्रसुतीपूर्वी केल्या जाणाया सोनोग्राफीमध्ये बाळाच्या पोटाचे दोन पदर चिकटलेले दिसले आणि त्यामुळे पोटात हवा भरली असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, प्रसुती नंतर नवजात बाळाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यानुसार बालरोग सर्जन डॉ. धनंजय वझे यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया करून बाळाला जीवदान दिले. याप्रसंगी बालरोग तज्ज्ञ डॉ.कुरणे, डॉ.पार्वती हळबे, रॅडिलॉलिस्ट डॉ.नेताजी पाटील, भूलतज्ज्ञ डॉ.गौरव बाविस्कर, बालरोग तज्ज्ञ डॉ.अंकिता सुर्वे, डॉ. नताशा, पंक्ती, तनिषा, प्रतिक, स्वप्निल यांचे सहकार्य लाभले. सदरील बाळाची शस्त्रक्रिया ही महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मोफत करण्यात आली.
