मराठी अध्यापकांचा सन्मान संपन्न

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे वेंगुर्ला तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्य करणाऱ्या अध्यापकांचा शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये राजेश आव्हाड, आक्काबाई भवरे, तन्वी ओटवणेकर (बावडेकर विद्या.शिरोडा), साक्षी वराडकर (आसोली हाय.), श्रद्धा नाईक, मोहन जाधव (सरस्वती विद्या.आरवली-टांक), किशोर सोनसुरकर, रेश्मा चोडणकर (दाभोली न्यू.इं.स्कूल), सुनिल जाधव (मठ हायस्कूल), अर्जुन माळी (चमणकर हाय.आडेली), शैलेश तांबे (स.का.पाटील, केळुस), चंद्रशेखर जाधव (माऊली विद्या.रेडी), विजय ठाकर (अणसूर पाल हाय.), सतिश चांदणे व दिपक बोडेकर (न्यू.इं.स्कूल उभादांडा), महेश बोवलेकर व मनिषा खरात (पाटकर हाय.), सचिन बिडकर व मनिषा कांबळे (वेंगुर्ला हाय.), सोमनाथ बागूल (देसाई विद्या.परूळे), भक्ती नाईक व निलेश पेडणेकर (सातेरी हाय.वेतोरे), सिद्धी हरमलकर (सिंधु.विद्या.), पूजा गावडे (मदर तेरेसा), विशाखा वेंगुर्लेकर (निवृत्त, आसोली हाय.), डॉ.सदाशिव चुकेवाड व राजकुमार हराळे (बॅ.खर्डेकर महा.), किशोर नांदिवडेकर (जनता विद्या.तळवडे), हर्षला कंरजेकर (देसाई इं.स्कूल) यांचा समावेश होता. हा कार्यक्रम बॅ.नाथ पै स्मृती सभागृहात संपन्न झाला. उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक वंृदा कांबळी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुक्त पत्रकार अजयराज वराडकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, वाईल्डलाईफ छायाचित्रकार सुनिलचंद देशपांडे, निवृत्त बँक अधिकारी सचिन डोणकर, कोमते·श्वर तपकिरे, निवृत्त प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर आदी उपस्थित होते. तर स्वप्निल वेंगुर्लेकर, पी.के.कुबल आणि प्रितम ओगले यांनी मराठी भाषा गौरवपर कविता सादर केल्या. सूत्रसंचालन पत्रकार महेंद्र मातोंडकर यांनी केले. तर आभार डॉ.सचिन परूळकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेश राऊळ, विवेक तिरोडकर व भूमी परूळकर यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply