विद्यार्थ्यांनी भरविलेल्या आठवडा बाजारात 46 हजारांची उलाढाल

शिक्षणासोबतच मुलांना व्यवहार ज्ञान समजावे या उद्देशाने वेंगुर्ला शाळा नं.1च्यावतीने ७ एप्रिल रोजी मुलांच्या सहभागात शाळेच्या प्रांगणात आठवडा बाजार भरविण्यात आला. याचे उद्घाटन नगरसेवक अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष सेजल रजपूत, शिक्षणप्रेमी संजय पिळणकर, मुख्याध्यापक ज्ञाने·श्वर हरमलकर, व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच सर्व शिक्षक आणि पालक यावेळी उपस्थित होते. या बाजारात विद्यार्थ्यांनी भाजीपाला, नाश्ता,आंबे, पुरणपोळी, थंडपेय, कोकणी मेवा, नारळ, मोदक, विविध मसाले, भेळ, कलिंगड, सुके मासे आदी विक्रीस ठेवले होते. पालकांसह परिसरातील नागरिकांनी या बाजाराला भेट देत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. या बाजारात सुमारे 46 हजारांची उलाढाल झाल्याची माहिती शाळेतर्फे देण्यात आली. या उपक्रमाला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, केंद्रप्रमुख महादेव आव्हाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच पाटकर हायस्कूलच्या शिक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave a Reply