रिक्त वैद्यकीय अधिकारी पदांचा प्रश्न जटील झालेल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ.विशाल उर्फ व्ही. एन.रेड्डी (M.D.फिजिशियन) हे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या मागणीला यश आले आहे. कृती समितीच्यावतीने आज डॉ. रेड्डी यांचे स्वागत करण्यात आले. डॉ.रेड्डी हजर झाल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आय.सी.यु. युनिट पूर्ण क्षमतेने सुरु करणार असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी सांगितले. डॉ. रेड्डी यांची मूळ नियुक्ती जिल्हा रुग्णालय ओरोस येथे होती. तिथून ते काही काळ कणकवली येथे कार्यरत होते. मात्र वैद्यकीय अधिकारी यांच्या कित्येक जागा रिक्त असल्याने आणि न्यायालयीन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी कृती समितीने 26 जानेवारीला उपोषणाचा इशारा दिला होता. यासंदर्भात प्रशासनासोबत कृती समितीच्या बैठका झाल्या होत्या. त्या बैठकांमधून डॉ. रेड्डी यांचे नाव समोर आले. त्यावर निर्णय होऊन आदेश प्राप्त झाले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी डॉ. रेड्डी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हजर झाले. याप्रसंगी कृती समितीचे सदस्य, अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्राध्यापक सुभाष गोवेकर, रवींद्र ओगले, एन.बी. रेडकर, राजू केळुसकर, अण्णा म्हापसेकर, जितेंद्र मोरजकर, सामाजिक बांधिलकीच्या सचिव समीरा खलील रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.
