वेंगुर्ला हायस्कूलचा वार्षिक बक्षिस वितरण संपन्न

        वेंगुर्ला हायस्कूलचा वार्षिक बक्षिस वितरण सोहळा प्रसिद्ध नाट¬ अभिनेते व व्हिएचएस असोसिएशनचे अध्यक्ष संजय पुनाळेकरी, मराठी लेखिका वंृदा कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत 19 डिसेंबर रोजी संपन्न झाला. हायस्कूलच्या “ज्ञानदीप’ हस्तलिखिताचे प्रकाशन यांच्याच हस्ते झाले.
यावेळी शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात नैपुण्य मिळविणा-या गुणवंत विद्याथ्र्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सचिन बिडकर यांनी केले. पर्यवेक्षक थोरात यांनी अहवाल वाचन केला. शिक्षिका विमल शिंगाडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. वृंदा कांबळी यांनी विद्याथ्र्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. तर संजय पुनाळेकर यांनी हायस्कूलच्या उपक्रमांचे आणि विद्याथ्र्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

Leave a Reply