वेंगुल्र्यातील दहा मुलांवर फायमोसिस व टंगटाय शस्त्रक्रिया

  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत वेळेवर निदान, समुपदेशन आणि शासकीय सहकार्यामुळे फायमोसिस व  टंगटाय शस्त्रक्रिया करण्यात आली. 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करताना फायमोसिस व टंगटायची मुले आढळली. सुरूतीला शस्त्रक्रियेसाठी ते मानसिकदृष्ट¬ा तयार नव्हते. पण आर.बी.एस.के.टीमच्या आरोग्य कर्मचा­यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे अखेर कुटुंबाचा विश्वास मिळवण्यात यश आले.

                प्रथम डॉ. वजराटकर व डॉ. संदीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रूग्णालय, वेंगुर्ला येथे संशयित मुलांची प्रि सर्जिकल कॅम्प घेऊन तपासणी करण्यात आली. डॉ. सुप्रिया रावळ, डॉ.भगवान मंुडे यांनी त्यांच्यामधील दोष शोध काढला. तसेच औषध निर्माण अधिकारी तनुश्री नाईक व आरोग्यसेविका संजना मोचेमाडकर यांनी पालकांचे समुपदेशन करून त्यांना विश्वास दाखविला. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालय येथे जनरल सर्जन डॉ.वजराटकर, भुलतज्ज्ञ डॉ.पंडित, बालरोगतज्ज्ञ डॉ.संदिप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

                यासाठी सिस्टर डिसोजा, सिस्टर घाटवळ, सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. तसेच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आर.बी.एस.के.कार्यक्रमाचे पर्यवेक्षक राजेश पारधी आणि जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे पालकांमधून समाधानाचे चित्र आहे. 

 

Leave a Reply