महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला महिला आघाडीतर्फे ‘वसा दातृत्वाचा व वेशभूषा स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. ‘वसा दातृत्वाचा’ या उपक्रमांतर्गत होडावडा येथील रितिका प्रकाश गोसावी या आईवडिलांचे छत्र हरपलेल्या मुलीला आर्थिक मदत करण्यात आली. तसेच अपंगत्वावर मात करत क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्मिता गावडे यांचा सत्कार करण्यात आला. शालेय विद्यार्थिनींसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यात पहिली ते दुसरी गटामध्ये कनिका इंदुलकर (शिवाजी प्राग.), परी सडवेलकर (राणी लक्ष्मीबाई), तिसरी ते पाचवीच्या गटात सान्वी परब (परबवाडा नं.1), स्वरा बरकुटे (मातोंड), प्रांजल नार्वेकर (उभादांडा नं.3) तर सहावी ते सातवीच्या गटामध्ये श्रुती मराठे (मठ नं.2), हर्षिता मुळीक (परबवाडा नं.1), गायत्री कावले (मठ नं.2) यांनी यश संपादन केले. स्पर्धेचे परीक्षण खानोलकर मॅडम, तेरसे मॅडम, शितोळे मॅडम, मार्गी मॅडम, कर्पूरगौर जाधव व देसाई यांनी केले.
यावेळी तालुका अध्यक्ष प्रसाद जाधव, तालुका शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, राज्य पदाधिकारी सचिन मदने, जुनी पेन्शन संघटना राज्य पदाधिकारी राजू वजराटकर तर कोकण विभाग सचिव संतोष परब, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, जिल्हा कार्यकारिणी चिटणीस कर्पूरगौर जाधव, तालुका सचिव रामा पोळजी, शिक्षक नेते सीताराम नाईक, वेंगुर्ला शिक्षक पतपेढी संचालक सीताराम लांबर, महिला आघाडी अध्यक्षा ऋतिका राऊळ, सरोज जानकर, शिक्षक नेत्या नेहा गावडे, सल्लागार भाऊ आजगांवकर, एकनाथ जानकर, प्रतिमा पेडणेकर, देवयानी आजगांवकर यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होता.
दरम्यान, विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, वेंगुर्ला नं.2च्या मुख्याध्यापिका उर्मिला वेंगुर्लेकर व दाभोस शाळेचे मुख्याध्यापक उदय साळकर यांच्या यशस्वी सेवापूर्तीनिमित्त त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता सातपुते यांनी तर आभार राशी पोळजी यांनी मानले.
