रेडी ग्रा.पं.चा आदर्शवत उपक्रम

ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि पालकांना आर्थिक हातभार लावण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी ग्रामपंचायतीने एक आदर्शवत पाऊल उचलले असून रेडी सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी-माजी लोकप्रतिनिधी, तंटामुक्त अध्यक्ष यांच्यावतीने रेडी गावामध्ये ज्या जि. प. शाळा आहेत, त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर त्या कुटुंबाची घरपट्टी सर्वस्वी ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी भरणार आहेत. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच पटसंख्या वाढविणे आणि जि.प.शाळांकडे पालकांचा कल वाढविणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. या कामी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांचेही सहकार्य लाभले असल्याचे सरपंच रामसिंग राणे यांनी सांगितले. रेडी ग्रा.पं., लोकप्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल पालकांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. हा उपक्रम इतर गावांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

Leave a Reply