विद्यार्थ्यांना चांगल्या हुद्यावर झळकविण्यासाठी आमचे प्रयत्न-विशाल परब

        कोकण कला व शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-तुळस आणि विशाल परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी, बारावी व स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळा १४  जुलै रोजी पार पडला. याप्रसंगी व्यासपिठावर भाजपाचे युवानेते विशाल परब बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी, कोकण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, नगरसेवक रवी शिरसाट, सचिन शेटये, गौरी माईणकर, रिया केरकर, युवराज जाधव, समिर कुडाळकर यांच्यासहीत तालुक्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व प्राचार्यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यातील मुलांना राज्यासहीत देशपातळीवर झळकताना पहाण्याची आमच्या सर्व लोकप्रतिनिधींची इच्छा आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी विधानसभा मतदार संघात विविध कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन करणार असून देशात चांगल्या हुद्यावर विद्यार्थी चमकण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. ज्या ठिकाणी गरज भासेल, त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने परिश्रम घ्यावेत, असे प्रेरणादायी मार्गदर्शन विशाल परब यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वेताळ प्रतिष्ठानचे डॉ.सचिन परूळकर यांनी मानले.

Leave a Reply