बॅ.खर्डेकर महाविद्यालय येथे मुंबई विद्यापीठाच्या कोकण झोन-०४ अंतर्गत आयोजित पुरुष व महिला शूटींग रेंज स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. कोकण विभागातील विविध महाविद्यालयांतील युवा नेमबाजांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या नेमबाजी कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. महिला गटातील एअर पिस्तुल प्रकारात प्रथम-चैत्राली करंगुटकर, द्वितीय-समिका गावडे, तृतीय-अमृता रेवंडकर (तिन्ही खर्डेकर कॉलेज), ओपन साईट प्रकारात प्रथम-तन्वी पारकर (कणकवली कॉलेज), द्वितीय-कोमल झोरे (एस.पी.के. सावंतवाडी), तृतीय-रिया परब (एस.आर.एम.कुडाळ), महिलांच्या पीप साईट प्रकारात प्रथम-साक्षी डांगे (डी.बी.जे. चिपळूण), द्वितीय-ग्रीष्मा परब (एस.आर.एम.कुडाळ), तृतीय-सानिका गावडे (खर्डेकर कॉलेज).
पुरुषांच्या पीप साईट प्रकारात प्रथम- शमित लाखे (वाय.बी.आर.टी. सावंतवाडी), द्वितीय-सहीश तलमकर (एस.पी.के.सावंतवाडी), तृतीय-विनय सावंत (ए.सी.एस. कॉलेज, ओरोस), ओपन साईट प्रकारात प्रथम-मार्तंड झोरे (एस.बी. कीर लॉ कॉलेज), द्वितीय-साहिल तावडे (कणकवली कॉलेज), तृतीय-उमाजी कदम (एस.आर.एम. कुडाळ), पुरुषांच्या एअर पिस्तुल प्रकारात प्रथम-सहीश तलमकर (एस.पी.के. सावंतवाडी), द्वितीय-सर्वार्थ जाधव (खर्डेकर कॉलेज), तृतीय-अंकुश नाईक (खर्डेकर कॉलेज), ओपन साईट पुरुष सांघिक अजिंक्यपदात एस.आर.एम. कॉलेज, कुडाळने प्रथम, कणकवली कॉलेजने द्वितीय, तर बी.के.एस.व्ही. कॉलेज, लांजाने तृतीय क्रमांक मिळविला.
समारोपप्रसंगी तहसीलदार ओंकार ओतारी, मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, कोकण विभागीय क्रीडा समिती सचिव प्रा.शशांक उपशेटे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, जिमखाना प्रमुख डॉ.कमलेश कांबळे, क्रीडा संचालक प्रा. जयसिंग नाईक, गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा.सुदाम माने, कांचन उपरकर, डॉ. चंद्रकांत नाईक, प्रा. सदाशिव चुकेवाड यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
