भाजपा तुळस आणि आर. सी.सी.ग्रुप तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री शिवाजी हायस्कूल, तुळस येथे २ आणि ३ ऑक्टोबर कालावधीत ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ ही राज्यस्तरीय निमंत्रितांची संगीत भजन स्पर्धा घेण्यात आली. याचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि युवानेते विशाल परब यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत प्रथम-सोमाजाई मंडळ (रायगड), द्वितीय-गांगो रामेश्वर मंडळ (मालाड), तृतीय-सद्गुरू मंडळ (अणसूर), उत्तेजनार्थ-रवळनाथ मंडळ (घोटगे), निषाद मंडळ (आरोस), विश्वकर्मा मंडळ (राठिवडे)यांनी पटकाविले. उत्कृष्ट गायक-जयेश घाडी (मालाड), उत्कृष्ट पखवाज-आकाश साळगांवकर (वेंगुर्ला), उत्कृष्ट तबला-अक्षय कांबळी, उत्कृष्ट हार्मोनियमवादक -अक्षय परूळेकर, उत्कृष्ट कोरस-रवळनाथ मंडळ कुडाळ, उत्कृष्ट झांटवादक – विष्णू स्मृती भजन मंडळ डोंबिवली, उत्कृष्ट गजर-सद्गुरू मंडळ वेंगुर्ला, उत्कृष्ट गौळण-रवळनाथ मंडळ कुडाळ, उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ-विष्णू स्मृती भजन डोंबिवली तर उत्कृष्ट तबला-पखवाज जुगलबंदी-मेजारेश्वर मंडळ कणकवली. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार, ११ हजार तर उत्तेजनार्थ अनुक्रमे ७ हजार, ५ हजार आणि ३ हजार अशी रोख पारितोषिक आणि चषक देऊन तसेच वैयक्तिक विजेत्यांना परीक्षक दीप्तेश मेस्त्री, मोहन मेस्त्री, उद्योजक सुधीर झांटये, संदिप पेडणेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नाना राऊळ, आनंद माळकर, बाबा राऊळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन अजय नाईक, प्रास्ताविक वैभव होडावडेकर व निवेदन प्रा.वैभव खानोलकर यांनी केले.
