दीपावली शो टाईम अंतर्गत माणिकचौक येथे शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे १० नोव्हेंबर रोजी भव्य समई नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यात कालिका समई नृत्य ग्रुप, डिगस – प्रथम, गवळदेव समई नृत्य ग्रुप, बोर्डवे-द्वितीय तर देवी सातेरी समई नृत्य ग्रुप, मठ यांनी तृतीय क्रमांक पटकाविले. उत्कृष्ट सादरीकरणाचे बक्षीस संत लालाजी टाकयेवाडी-मठ यांना तर परबवाडा शाळा नं.१च्या मुलींना विशेष समई नृत्य म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण हर्षू बागायतकर आणि मयुरी माडकर यांनी केले. तसेच ऑनलाईन संस्कार भारती रांगोळी स्पर्धेत प्रथम-मेघना राऊळ, द्वितीय-अपर्णिता वेंगुर्लेकर आणि तृतीय-तृणाली माळकर यांनी पटकाविवले. स्पर्धेचे परीक्षण श्रुती दाभोलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी साक्षी चमणकर, शैलेश परूळेकर, नगरसेविका मयुरी केरकर, ज्ञानेश्वर रेडकर, स्वप्निल पालकर, वैभव फटजी, मंजूषा आरोलकर, सुजित चमणकर, डेलिन डिसोजा, सुहास मेस्त्री, मंडळाचे अध्यक्ष रोहित वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष नितीश कुडतरकर, खजिनदार प्रथमेश यंदे, कार्याध्यक्ष विनय गोगटे, अनिकेत ताम्हणकर, रूपेश अणसूरकर, अनिल देसाई, करण करंगुटकर, प्रताप करंगुटकर आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात वासुदेव बांदेकर, जगन्नाथ अणसूरकर, प्रमोद यंदे, संतोष वेंगुर्लेकर, सुभाष अणसूरकर, कमलाकर माळवदे, विजया परब या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वरया फाऊंडेशन, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, लिना म्हापणकर, काजल कुबल, भूषण आंगचेकर, आनंद रेडकर, प्रसाद गुरव, हर्षद रेडकर, बंड्या तुळसुलकर, दर्शन तानावडे, किशोर पोतदार, भाऊ मालवणकर, अमर दाभोलकर, उदय मालवणकर, हेमंत गावडे, सुमन कामत, रवी राऊळ, सोहम गरगटे यांच्यासह लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांचे सहकार्य लाभले.
