स्वच्छ सर्वेक्षणात वेंगुर्ला जिल्ह्यात प्रथम

वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२२मध्ये पश्चिम विभागामध्ये १६ क्रमांक व पंधरा हजारापेक्षा कमी लोकसंख्येच्या गटामध्ये महाराष्ट्रामध्ये आठवा क्रमांक प्राप्त केला आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यात अधिकचे गुण घेऊन पालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. शिवाय पालिकेला ओडीएफ प्लस प्लसहे मानांकन देखील प्राप्त झाले आहे. शहरास एक तारांकित मानांकन प्राप्त होण्यासाठी माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, शहरातील सर्व नागरिक यांनी सक्रीय सहभाग घेतल्यामुळे हे यश प्राप्त झाले असल्याचे मुख्याधिकारी सोंडगे यांनी सांगितले.

Leave a Reply