वेंगुर्ल्यातील २२ ग्रा.पं.च्या निवडणुका

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२या कालावधीत मुदत संपणा­-या ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. १८ नोव्हेंबर रोजी तहसिलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर रोजी दु.३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे मागविणे व सादर करणे, ५ डिसेंबर रोजी स.११ पासून नामनिर्देशन पत्रांची छाननी, ७ डिसेंबर रजी दु.३पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे. याच दिवशी दु.३नंतर निवडणूक चिन्ह नेमून देणे व निवडणूक लढविणा­­या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे, १८ डिसेंबर रोजी स.७.३० ते ५.३० या वेळेत मतदान व २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. वेंगुर्ला तालुक्यामध्ये अणसूर, आसोली, आडेली, उभादांडा, कुशेवाडा, केळूस, कोचरा, चिपी, तुळस, दाभोली, परबवाडा, पाल, भोगवे, मठ, म्हापण, रेडी, वजराट, वेतोरे, शिरोडा, होडावडा, मेढा, पालकरवाडी आदी २२ ग्रा.पं.च्या निवडणुका होणार आहेत.   

Leave a Reply