मंदिर परिसर विकासाच्यादृष्टीने भूमिपूजन

वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर या प्राचिन धार्मिक स्थळाचे सुशोभिकरण करण्याच्या हेतूने देवस्थान तळी व परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात येणार आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत पर्यटन अनुदान योजनेमधून ५० लाख एवढा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ भूमिपूजन समारंभ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने ३० ऑक्टोबर रोजी संपन्न झाले.यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, वास्तुविशारद अमित कामत, सचिन वालावलकर, संजय आंग्रे, सुनिल डुबळे, उमेश येरम, नितीन मांजरेकर, सुहास गवंडळकर, देवस्थान ट्रस्टचे दाजी परब, मानकरी सुनिल परब, सुंदर परब, वसंत परब व अन्य उपस्थित होते.

Leave a Reply