प्रसिद्ध कवयित्री तथा सिंधुदुर्गची कन्या डॉ.सौ.स्नेहा राणे यांना त्यांनी लिहिलेल्या “शहर आणि मी’ या काव्यसंग्रहाला कवयित्री शांता शेळके साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून मान्यवरांच्या हस्ते सौ.राणे यांना हा पुरस्कार पुणे येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्कार हा कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानतर्फे जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराबद्दल सौ.राणे यांचे अभिनंदन होत आहे.
