पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रोटरीचा पुढाकार

सिंधुदुर्ग रोटरी परिवार आणि व रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांनी कोकणातील पाणी प्रश्नावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे पाण्याचा स्तर वाढविण्यासाठी व भविष्यातील पाणी टंचाई प्रश्नावर मात करण्यासाठी शास्त्रीय उपाययोजनेचा वापर कसा करावा याबाबत बॅ.खर्डेकर महाविद्यालयात 25 नोव्हेंबर रोजी कार्यशाळा घेण्यात आली.

पाणी टंचाई आणि पर्यावरण रक्षण हे रोटरी इंटरनॅशनच्या विविध उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3170चे डिस्ट्रिक्ट गव्र्हनर अरूण भंडारे यांनी चेक वॉटर डॅम हे उद्दिष्ट दिलेले आहे. त्यानुसार ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी रोटरी क्लब सिंहगड पुणे येथील प्रसिद्ध जलप्रेमी सतिश खाडे यांनी पाणी प्रश्नावर माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष आनंद बोवलेकर, असिस्टंट गव्र्हनर डॉ.प्रशांत कोलते, इनरव्हीलच्या अध्यक्ष पूनम बोवलेकर, रोटरीचे प्रा.वसंतराव पाटोळे, प्रा.दिलीप शितोळे, प्राचार्य डी.बी.गोस्वामी, इनरव्हील सदस्य यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply