दुर्ग मावळा प्रतिष्ठान, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन तसेच मानवता विकास संस्था भारत यांच्या सहकार्याने 12 मार्च रोजी कॅम्प येथील श्री शिवाजी प्रागतिक शाळेमध्ये इतिहासाची साधने यावर प्रदर्शन भरविण्यात आले होते. दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे ज्ञाने·श्वर राणे आणि आबा चिपकर यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांचा इतिहास, शिवकालीन नाणी व हत्यारे याबाबत माहिती दिली. या उपक्रमाबद्दल शाळेच्यावतीने आयोजकांचे आभार मानले.
