जागतिक महिला दिनानिमित्त भटवाडी येथे 7 मार्च रोजी सलग तिसऱ्या वर्षी गृहिता महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेविका गौरी मराठे यांच्या संकल्पनेतून विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. याचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या ‘मी गृहिता 2026’ खेळ गृहिणींची सन्मान गृहितांचा स्पर्धेत परबवाडा येथील साक्षी परब ‘मी गृहिता 2026’ च्या मानकरी ठरल्या. त्यांचा फ्रीज देऊन तर अनिता मराठे-मयेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला त्यांना टीव्ही व मानसी परब यांनी तृतीय क्रमांक पटकावला त्यांना शेगडी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन नागेश नेमळेकर यांनी केले. ‘मिस गृहिता 2026 फॅशन शो’मध्ये तन्वी गोसावी (निरवडे) या मिस गृहिता 2026च्या मानकरी ठरल्या. नंदिनी बिले (सावंतवाडी) उपविजेत्या तर भक्ती जामसंडेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. बेस्ट स्माईल किताब शितल टिक्कल (कुडाळ) व बेस्ट कॉश्च्युम किताब पायल गावडे (वेंगुर्ला) यांनी पटकावला. विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण प्राईड गोवा विजेती माधवी शहापुरकर, लिना मलबारी व किरण मेस्त्री यांनी केले.
तसेच यावेळी घेतलेल्या महिलांच्या पाककला स्पर्धेत कविता राऊत (बिट इडली) यांनी प्रथम, सारिका खोबरेकर (शहाळ्याचा हलवा) यांनी द्वितीय तर जान्हवी कांबळी (इडली सांबार) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर पुरूषांसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पाककला स्पर्धेत मनोहर कावले (मासवडी) यांनी प्रथम, सुहास परब (शिरवाळे) यांनी द्वितीय व प्रितम राऊळ (लाव्हारीया) तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या दोन्ही स्पर्धांचे परीक्षण डॉ.सायली प्रभू, गौतम शिरसाट व अमित सुकी यांनी केल.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गृहिता महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष गौरी मराठे, सचिव डॉ.पूजा कर्पे, सदस्य प्रगती चव्हाण, संचया राऊळ, मंजुषा आरोलकर, रोहिणी लोणे, अनुराधा वेर्णेकर, नीता मुणनकर, शिवाली ताम्हणेकर, राधा बागवे, राधिका लोणे, रसिका परब यांनी मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर चराटकर यांनी केले.
