वेंगुर्ला शहर, परबवाडा आणि उभादांडा येथील शिमगोत्सवाला आगळीवेगळी परंपरा लाभली आहे. या शिगमोत्सवाची सांगता गुढीपाडव्याच्या पहाटे होते. त्यामुळे यावर्षी वेंगुर्ल्याचा शिमगोत्सव हा 17 दिवसांचा होता. या कालावधीत हौशी कलाकारांनी पौराणिक तसेच काल्पनिक सोंगे घेऊन नागरिकांचे मनोरंजन केले. बुधवारी धुळवडीनिमित्त शहरासह परबवाडा व उभादांडा परिसरात ठिकठिकाणी युवकांनी रंगपंचमी साजरी केली. सायंकाळनंतर रात्रौपर्यंत पूर्वस मंदिर येथील मुख्य मांडावरील होळीला नागरिकांनी श्रीफळ अर्पण केले. रात्रौ 11.30 नंतर बागायतवाडी, नमसवाडी आणि वाघे·ारवाडी येथील नागरिकांनी ढोलताशे आणि बॅन्जोच्या वाद्यांत आपापली रोंबटे मांडावर आणली. त्यानंतर धुळ मारून सार्वजनिक गाऱ्हाणे होऊन पहाटे उत्सवाची सांगता झाली.
