राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाचा ‘गरूडझेप महोत्सव’ 21 ते 23 मार्च या कालावधीत संपन्न झाला. यावर्षी प्रथमच आयोजित केलेली शिमगोत्सव स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच संघांनी पारंपरिक शिमगोत्सव नृत्य करीत उपस्थितांची मने जिंकली. यात श्री कले·श्वर ग्रुप नेरूर (सायचे टेंब)-प्रथम, मोरेश्वर मांडे·श्वर मित्रमंडळ नेरूर-वाघचौडी-द्वितीय, गावडोबा कले·श्वर ब्राह्मण नेरूर-रायवाडी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये राधा-कौस्तुभ वेंगुर्लेकर (गजानन चौपाटी), मैथिली गावडे (गावडोबा कले·श्वर ब्राह्मण नेरूर),राक्षस-गोट्या पाटकर(गजानन चौपाटी), भूषण गावडे (वाघचौडी), मारूती-वरू परब (मोरेश्वर मांडे·श्वर मित्रमंडळ नेरूर), अक्षय जोशी-समंध मित्रमंडळ नेरूर), संगीतसाथ-मोरेश्वर मांडे·श्वर मित्रमंडळ नेरूर आणि साई हनुमान मित्रमंडळ वालावल यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परीक्षण सौरभ पाटकर आणि वैभव खानोलकर यांनी केले. मंडळातर्फे घेतलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे 42 जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन कलावलय संस्थेचे अध्यक्ष बाळू खांबकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक समिधा रेडकर, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, रक्तदाते देवेंद्र गावडे, जबरदस्त मंडळाचे अध्यक्ष साबाजी राऊळ, पत्रकार भैय्या गुरव आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, डॉ.अनिल वनकुद्रे यांनीही या शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांचाही मंडळातर्फे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.चुरशीच्या झालेल्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत प्रथम-शुभ्रस्टार होडावडा, द्वितीय-खुशी फायटर तळवडे, तृतीय-जय आदिवासी वेंगुर्ला यांनी पटकाविला. बेस्ट अँकलमन म्हणून साहिल तळवणेकर आणि बेस्ट फ्रंटमॅन म्हणून दिपक पार्सेकर याला गौरविण्यात आले. यातील प्रथम तिन्ही संघांना अनुक्रमे 8 हजार, 5 हजार आणि 3 हजार रूपये तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून हेमंत नाईक, हेमंत गावडे, गौरेश वायगंणकर, ऋत्विक आंगचेकर, आकाश साळकर, त्रिंबक आजगांवकर यांनी काम पाहिले तर जयेश परब यांनी समालोचन केले. स्पर्धेचे उद्घाटन जि.प.सदस्य संजय गावडे, पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, नगरसेविका समिधा रेडकर, लिना म्हापणकर, मयुरी केरकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
