आमदार केसरकर यांनी शिक्षणमंत्रीसारखे संवेदनशील खाते हाताळले असतानाही त्यांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन पुन्हा घडविले. देवदेवस्की, तंत्र-मंत्र आणि काळ्या जादूच्या जोरावर सर्वांना वश करू पहाणाऱ्या केसरकरांचे खरात बाबाशी असलेले कनेक्शन समोर आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गची बदनामी झाली आहे. आमच्या मतदारसंघाचा आमदार खरातसारख्या विकृत मनोवृत्तीचा समर्थक आहे, ही गोष्टच लांच्छनास्पद असून केसरकरांना जरा जरी आत्मसन्मान असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनाम द्यावा, अशी मागणी वेंगुर्ला ठाकरे सेनेच्यावतीने करण्यात आली. आमदार केसरकर यांच्या कृतीचा निषेध म्हणून ठाकरे सेनेने कॅम्प कॉर्नर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निवेदन सादर केले. यावेळी तालुका प्रमुख निलेश चमणकर, जि.प.सदस्य संजय गावडे, माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्यासह बहुसंख्य ठाकरे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
