सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी रिक्त जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली असून, इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण/ कणकवली/ वेंगुर्ला अशा ३ ठिकाणी तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला, देवगड अशा ५ ठिकाणी आहेत. या ८ शासकीय वसतिगृहांमध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विद्यार्थी, विद्यार्थ्यीनींना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी या पोर्टलवर मोफत ऑनलाईन प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी नजिकच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशाची नोंदणी करण्यात यावी.
या वसतिगृहांमध्ये इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे प्रवेश सुरू होणार आहेत. या शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम, व इंटरनेट वाय-फाय, आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. या वसतिगृहातील गृहपाल, अधिक्षीका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग (02362228882) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त, संतोष चिकणे यांनी केले आहे.
