न.प.तर्फे किनारपट्टीची स्वच्छता

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत वेंगुर्ला नगर परिषदेने राबविलेल्या स्वच्छता अभियानात एक टन कचरा गोळा करण्यात आला. जलबांदेश्वर देवस्थान व झुलत्या पुलाखालील खाडी किनारी राबविलेल्या या अभियानात नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, पालिकेचे कर्मचारी, अधिकारी व नागरिकांनी सहभाग घेतला होता. पालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या झुलत्या पुलाजवळ कयाकिंग व अन्य जलपर्यटन विकसित झाल्याने येथे मोठ्या पर्यटकांची गर्दी होते. आता या हंगामाची समाप्ती झाली असली तरी समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा गोळा झाला होता. हा कचरा पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संपूर्णपणे हटवून आम्ही वेंगुर्ल्याची किनारपट्टी स्वच्छ करत आहोत, असे नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणाले.

Leave a Reply