वेंगुर्ला शाळा नं.1 मध्ये महिला दिन उत्साहात
शासनाच्या परिपत्रकानुसार महिला दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला शाळा नं.1च्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 8 मार्च रोजी सायंकाळी शाळेच्या 'विठाई' सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हापरिषद आरोग्य विभागाच्या अधिकारी समृद्धी परब आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांच्या हस्ते झाले. …
