व्यापा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कोणताही त्याग करेन-माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ

मला कोणतेही राजकारण करायचे नसून व्यापा-यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. गेली अनेक वर्षे व्यापार करीत असलेले गाळे त्यांना मिळाले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी मी कोणताही त्याग करण्यास तयार आहे अशी माहिती देताना माझ्याबाबीत नगराध्यक्ष यांनी केलेले वक्तव्य अत्यंत खोटे व संतापजनक असल्याचेही  वेंगुर्ला नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी म्हटले आहे.

        आपण उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केलेल्या वक्तव्याला प्रसिद्धीपकाद्वारे सौ.राऊळ यांनी उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वेंगुर्ला नगरपरिषदेने पहिल्यांदाच ज्यावेळी ई-लिलाव पद्धतीने गाळ्याचे वितरण करण्यासंदर्भात पवित्रा घेतला, त्यावेळी व्यापा-यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य नगराध्यक्ष किवा मुख्याधिकारी यांनी केले नाही. त्यामुळे व्यापा-यांनी स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर यांच्याशी संफ साधून सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आमदार केसरकर यांनी याबाबतीत नगरविकास मंत्री एकनाथ शिदे यांचे लक्ष वेधले. मंत्री शिदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार दि.६/८/२०२१ रोजी बैठकीचे आयोजन केले. यावेळी आमदार, सर्व अधिकारी, नगराध्यक्ष व व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत व्यापा-यांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरु असताना नगराध्यक्ष गिरप हे व्यापा-यांना गाळे कसे देता येणार नाहीत ही भूमिका मांडत होते. तसेच त्यांना आता आम्ही पर्यायी गाळे दिले असल्याने त्यांना नविन गाळ्यामध्ये स्थलांतरीत करण्याची आवश्यकता नाही. व्यापा-यांना ते गाळे दिल्यास नगरपरिषदेचे अधिक नुकसान होणार असल्याचे मत नगराध्यक्ष यांनी मांडले. यावरुन नगराध्यक्ष यांना व्यापा-यांच्याबाबतीत चिड व आकस असल्याचे जाणवते. परंतु, आता त्यांचा नाईलाज झाल्यामुळे आम्ही व्यापा-यांच्या बाजूने आहेत अशी भूमिका मांडण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचे सौ.राऊळ यांनी नमुद केले आहे.

Leave a Reply

Close Menu