श्रीमद् भागवत सप्ताह पारायण-निरुपण-प्रवचन सोहळा

दि. 21 एप्रिल ते 27 एप्रिल 2022 (चैत्र वद्य पंचमी ते वद्य द्वादशी 1944) या कालावधीत श्री देव वेतोबा संस्थान आरवली, ता. वेंगुर्ला येथे श्रीमद्‌ भागवत सप्ताह पारायण – निरुपण – प्रवचन सोहळ्याचे आजोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरुवात 20 एप्रिल रोजी  सायं. 4.30 वाजल्यापासून श्री भागवद्‌ ग्रंथ दिंडी, श्रीकृष्ण रथ शोभायात्रेने होणार आहे. श्रीदेवी माऊली मंदिर शिरोडा-श्रीदेवी सातेरी मंदिर-श्रीदेव वेतोबा मंदिर, आरवली येथे यात्रेची सांगता होणार आहे. 21 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमांसोबत सकाळी 8.30 वा. भगवान महाविष्णूंच्या अवतारकथा तसेच श्रीकृष्ण चरित्राचे प्रासादिक आणि रसाळ वाणीतून सुप्रसिद्ध प्रवचनकार सिद्धयोगी भागवताचार्य प.पू. श्री. हरीभाऊ जोशी महाराज, हैद्राबाद-आंध्रप्रदेश निरुपण करणार आहेत. तर 21 ते 27 एप्रिल सायंकाळी 4.30 ते 7.30 श्रीमद्‌ भागवत ग्रंथसंहिता वाचन वेदमूर्ती श्री. भालचंद्र जोशी आणि वेदमूर्ती श्री. श्रीनाथ रिंगे, म्हामसा-गोवा करणार आहेत. चैत्र व. अष्टमी रोजी श्रीकृष्ण जन्म सोहळा, गोवर्धन पूजा सोहळा साजरा होणार आहे. दि. 28 एप्रिल रोजी भागवद्‌ सप्ताह पारायण सांगता होणार असून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. खास लोकाग्रहास्तव 28 एप्रिल रोजी सायं. 7.30वा. सुधाकर दळवी संचलित चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ प्रस्तुत श्रीकृष्ण लिलेवर आधारीत महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. या संपूर्ण भक्तीमय सोहळ्यास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ब्राह्मण ऐक्यवर्धक संघ, आरवली पंचक्रोशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu