वेंगुर्ला ब्राह्मण मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

सिंधुदुर्ग ब्राह्मण मंडळ शाखा वेंगुर्लेचा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम 24 जुलै रोजी वेंगुर्ला- कुबलवाडा   येथील एकमुखी दत्तमंदिरात वेंगुर्ला शाखा अध्यक्ष श्रीकांत रानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

      या कार्यक्रमात अथर्व दामले, निधी जोशी, विद्यानंद सांडये, गोपिनाथ फाटक, गुरुप्रसाद दामले या दहावी उत्तीर्ण, अजंली सांडये, श्रावणी जोशी, मुक्ता केळकर, प्रथमेश लिमये, निधी बर्वे, चिन्मयी वैद्य या बारावी उत्तीर्ण, सायली दामले-बीएससी उत्तीर्ण, मनाली पणशीकर-बीकॉम उत्तीर्ण, प्राची गोरे बीएससी उत्तीर्ण, रोशनी निकम-बीएससीमध्ये खर्डेकर महाविद्यालयात प्रथम, श्रुती शेवडे-जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम आणि देवश्री पुराणिक-भरतनाट्यम्‌ प्रथम व एसटीसी कास्य पदक प्राप्त या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, रोख बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अरुण गोगटे, वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष विद्या नवाथे, ज्येष्ठ सदस्य मोहन फाटक, प्रमुख पाहुण्या व वक्त्या तथा सहज ट्रस्टच्या संचालिका मिनाक्षी अळवणी उपस्थित होत्या.

      मिनाक्षी अळवणी यांनी मुलांमधील मानसिक तणाव कोणते असू शकतात, आजूबाजूच्या वातावरणाचा एकूणच मुलांच्या जडणघडणीत कसा प्रभाव पडत असतो, त्यातून निर्माण होणारे ताणतणाव आणि त्यावर उपाय योजना याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी पालकांनी विचारलेल्या प्रश्‍नांचीही उत्तरे अळवणी यांनी दिली. सूत्रसंचालन ॲड.श्रीकृष्ण ओगले यांनी तर आभार दिलीप पणशीकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu