वेंगुर्ल्यात राष्ट्रवादीतर्फे पवार यांचे स्वागत

 वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शनिवारी वेंगुर्ल्यात दाखल झाले. यावेळी खर्डेकर कॉलेज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता कुबल, अँथोनी डिसोजा, जिल्हा सदस्य नितीन कुबल आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

      यावेळी शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माजी संचालक प्रज्ञा परब, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष संजीव लिंगवत, सिंधुदुर्ग जिल्हा सेलचे अध्यक्ष अँथोनी डिसोजा, स्वप्नील रावळ, योगेश कुबल, संतोष गाडगीळ, अनिकेत कुंडगीर, भरत आवळे आदी उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीतर्फे तालुका शिवसेनाप्रमुख यशवंत परब व राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष विधाता सावंत यांनी पवार यांचे स्वागत केले.

      शरद पवार यांनी वेंगुर्ल्यात आल्यानंतर आपले जुने सहकारी कृषिभूषण शिवाजी कुबल यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी दत्तप्रसाद कुबल दीपा कुबल, मिताली कुबल, अंकिता कुबल, नम्रता कुबल, नितीन कुबल, विवेक कुबल तसेच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अबिद नाईक, व्हिक्टर डॉन्टस, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अतुल रावराणे उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu