रस्त्यांवरील खड्डयांवर कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण

वेंगुर्ला तालुक्यातील चार मुख्य महामार्गांवर पडलेल्या खड्डयांबाबत वेंगुर्ला रिक्षा संघटना, दुचाकी व चारचाकी आणि वेंगुर्ल्यातील जागृत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिका­यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यात त्यांनी म्हटले आहे की, वेंगुर्ला-शिरोडा ते रेडी रेवस मार्ग (सागरी महामार्ग), मठ-आडेली, कामळेवीर ते आकेरी तिठ्यापर्यंत, दाभोलीमार्गे तेंडोलीपर्यंत आणि तुळसमार्गे होडावडापर्यंत या तालुक्यातील मुख्य चार रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. वाहनचालक व शाळकरी मुले अपघात होण्याच्या भितीने जीव मुठीत धरुन प्रवास करीत आहेत. रस्त्यांच्या झालेल्या या दुदर्शेवर त्वरित उपाययोजना म्हणजेच खडीकरण आणि डांबरीकरण करुन रस्ते वाहतुकीस सुरळीत करुन द्यावेत. तसेच रस्त्यालगत वाढलेली झाडी तोडून साफ करावी असे नमुद केले आहे. आपल्या या मागण्यांचा विचार न झाल्यास १८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सर्व मुख्य रस्त्यांवर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. दरम्यान, उपोषणावेळी झालेल्या नुकसानास किवा अपघातास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असे म्हटले आहे. बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनावर रिक्षा चालक-मालक संघटनेचे तालुका अध्यक्ष एकनाथ राऊळ, चितामणी धुरी, लवू तेरसे, मिलिद निकम, शेखर धावडे, नरेश बोवलेकर, सचिन बागवे आदी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेखर चोपडेकर, यतिन खानोलकर, राजन करंगुटकर, रविद्र राऊळ, विश्राम परब, अॅन्थोनी फर्नांडीस, विलास धुरी, श्रीधर भोगले, मोहन कुंडेकर, लक्ष्मण मांजरेकर, फिरोज शेख, ज्ञानेश्वर देवजी, संतोष कोरगांवकर, प्रणय कोरगांवकर यांच्यासह एकूण ४० जणांच्या स्वाक्ष­-या आहेत.

 

 

Leave a Reply

Close Menu