दुर्बिणीद्वारे विद्यार्थ्यांनी अनुभवले पक्षी निरीक्षण

    येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांकडून निसर्गामध्ये जाऊन पक्षांची चित्रे काढणे, त्यांचे निरीक्षण करणे आणि नोंदी ठेवणे असा उपक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापक आत्माराम सोकटे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. उपस्थित विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दुर्बिणीद्वारे पक्षी निरिक्षणाचा अनुभव घेतला. ‘तुम्ही जगा, पक्षांनाही जगू द्या’, ‘पक्षी माझा मित्र’, ‘पक्षी वाचवा-सृष्टी वाचवा’ असे संदेश विद्यार्थ्यांनी चित्रांमधून दिले. वेंगुर्ला विभागाचे वनपाल बागुल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Close Menu