लिनेसच्या मालवणी नाटिकेला दुसरा क्रमांक

सोलापूर सूर्यप्रभा येथे नुकत्याच पार पडलेल्या डिस्टिक एम.एच.टू.दिव्यध्वनी येथील मिटिंगमध्ये लिनेस क्लब ऑफ वेंगुर्ल्याच्या प्रेसिडेंटलिनेस उर्मिला सावंत यांना बेस्ट प्रेसिडेंट व ट्रेझरर कविता भाटिया यांना ‘बेस्टट्रेझरर इन डिस्ट्रिक्ट’ अशी अवार्ड मिळाली. तसेच मनोरंजन व स्पर्धा यात वेंगुर्ला लिनेस क्लबने सादर केलेल्या “मालवणी गजाली“ या नाटिकेला दुसरा क्रमांक मिळाला.

      यात दिग्दर्शक लिनेस ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, प्राची मणचेकर, हेमा गावस्कर, नीला यरनाळकर, अंजली धुरी, उर्मिला सावंत यांनी भाग घेतला. या कार्यक्रमास सेक्रेटरी लिनेस शर्मिला मठकर, अश्विनी गावस्कर, मंदाकिनी सामंत उपस्थित व सहभागी होत्या.

Leave a Reply

Close Menu