शहिदांच्या माता व पत्नींचा गौरव

 खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहिद झालेल्या जवानांच्या माता व पत्नींना गौरविण्यात आले.

      यामध्ये शहिद शिपाई धोंडी कदम यांचा पुतण्या तुषार कदम (मालवण-पोखरण)शहिद नायक बाबली राजाराम राजगे यांचा मुलगा सूर्यकांत राजगे (कलंबिस्त)शहिद सुभेदार अंकुश महादेव तेजाम यांच्या पत्नी सुप्रिया तेजाम (देवसू)शहिद शिपाई शांताराम महादेव कदम यांच्या पत्नी सविता कदम (सांगेली)शहिद शिपाई रामचंद्र शंभा कुडतरकर यांच्या स्नुषा रेश्मा कुडतरकर (सबनीसवाडा)शहिद नायक तुकाराम गावडे यांच्या पत्नी प्रभावती गावडे (नांदोस)शहिद शिपाई सदाशिव बाईत यांचा मुलगा रविंद्र बाईत व स्नुषा रश्मी बाईत (नेतर्डे)शहिद शिपाई एकनाथ धोंडू नाईक यांच्या पत्नी विद्या नाईक (माणगांव)शहिद शिपाई महादेव विष्णू नाईक यांचा भाऊ बाळकृष्ण नाईक (सावंतवाडी) यांचा विठ्ठल पंचायतनाचे व्यवस्थापक दादा पंडीतगोवा-मडगांव येथील उद्योजक महेश नायकउल्हास सावंतप्रदीप घाडी आमोणकरमालवणचे उद्योजक विलास हडकरकुडाळ येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी गुरुनाथ हेरेकरउद्योजक राजाराम गावडेसिद्धिविनायक मंगल कार्यालय वेंगुर्ल्याचे संचालक दिलीप मालवणकरउद्योजक बाप्पा कवठणकरमाजी सरपंच श्यामसुंदर मुणनकर यांच्या हस्ते साडीश्रीफळसन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

      विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त ३ मार्च रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसगी जेष्ठ पत्रकार देवयानी वरसकरविकास गांवकरअभिमन्यू लोंढेराजू तावडेविनायक वंजारेभरत सातोस्करराजा सामंतगोवा-मडगांवचे महेश नायकप्रदीप आमोणकरउद्योजक राजाराम गावडेबाप्पा कवठणकरविलास हडकरदिलीप मालवणकर यांचाही शालश्रीफळसन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन राजा सामंत यांनी केलेतर कार्यक्रमाच्या सुरवातीस गणेश वंदना व वीर जवानांवर देशभक्तीपर गीत आधारीत गीत देवगडची १२ वर्षाची मुलगी दुर्वा मनिष कुबल हिने सादर केले. या गीतांच्या उत्कृष्ट सादरीकरणांस उपस्थितांकडून टाळ्यांच्या कडकडाटाने उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Close Menu