उभादांडा येथे १४८ जणांची आरोग्य तपासणी

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान-गोवा, स्वामी विवेकानंद संस्था, खेडशी-मोपा, उभादांडा ग्रा.पं. व रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला संयुक्त विद्यमाने उभादांडा शाळा नं.३च्या अंगणवाडी  येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप कार्यक्रमाचा १४८ जणांनी लाभ घेतला. उद्घाटन डॉ.प्रशांत संसारे यांच्या हस्ते झाले. रोटरीचे अध्यक्ष सुनिल रेडकर यांनी रोटरीच्या समाजपयोगी कार्याची माहिती दिली. भारतीय आयुर्वेद संस्थानमध्ये सुसज्ज हॉस्पिटलची सोय असून येथे पंचतारकित हॉस्पिटलप्रमाणे येथे वैद्यकिय शिक्षण देऊन माफक दरात रुग्णांवर औषधोपचारही केले जाते. सिधुदुर्गातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.संसारे यांनी केले. सरपंच निलेश चमणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सभापती जयप्रकाश चमणकर, रमेश नार्वेकर, तंटामुक्ती अध्यक्ष आनंद मोचेमाडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोचेमाडकर आदी उपस्थित होते.

         राजेश घाटवळ व नितीन कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, तर पंकज शिरसाट यांनी आभार मानले. रोटरीचे दादा साळगांवकर यांनी या शिबिराचे यशस्वीतेची जबाबदारी पार पाडली. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ.अखिलेश शुक्ला, डॉ.राजेश रुके, डॉ.दिपा शिरोडकर, डॉ.सायली कासार, फार्मासिस्ट भक्ती चव्हाण व दर्शन सावंत, स्टाफ नर्स सुमा नाईक, पिकी मेडिकल स्टाफ शशिकांत तिरोडकर, रामा करंगुटकर, सागर धुरी, स्थानिक आरोग्य सेविका इदालिन कार्डोज, अंगणवाडी सेविका, स्थानिक आशा वर्कर व रोटरीचे योगेश नाईक, आनंद बोवलेकर, मुकुल सातार्डेकर, प्रथमेश नाईक, दिपक ठाकूर, राजू वजराटकर, सुरेंद्र चव्हाण यांनी  विशेष सहाय्य केले. रोटरी जिल्हा ३१७०चे जिल्हा सचिव अशोक नाईक यांच्या हस्ते उपस्थित डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना रोटरीचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu