पडवळ आणि शेटकर अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानीत

 शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात सातत्याने पुढाकार घेऊन सेवा कार्य करणा-या व ग्रामपंचायत गटांमध्ये तसेच महिला व बालविकास क्षेत्रामध्ये विधायक कार्य करणे, सामाजिक क्षेत्रामध्ये हिरिरीने भाग घेणे, महिला अत्याचार रोखण्यासाठी भाग पाडणे, महिला बचत गट आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तुळस गावातील सुजाता अजित पडवळ आणि पार्वती लक्ष्मण शेटकर या दोन महिलांना महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्यावतीने ग्रामपंचायत स्तरावर दिला जाणारा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण 31 मे रोजी तुळस ग्रामपंचायत येथे सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते झाले. यावेळी विजय रेडकर, गावातील ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ग्रामविकास अधिकारी सुनिल चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Close Menu