पाणी टंचाई अंतर्गत शहरात पाणी पुरवठा

          उन्हाळी पाणी टंचाई अंतर्गत वेंगुर्ला शहरातील ज्या भागात पिण्याचा पाण्याची समस्या आहे, अशा भागात शिवसेनेकडून मोफत पाणीपुरवठा सुरु ठेवण्यात आलेला असल्याचे शिवसेनेचे वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम यांनी सांगितले.

      नगरपरिषदेच्या नळयोजनेचे पाणी ज्या भागात नागरिकांना पोहोचत नाही, आणि उन्हाळी पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे. अशा वेंगुर्ला बंदर रोड, दाभोसवाडा, राजवाडा, विठ्ठलवाडी, कलानगर, गावडेवाडी, कुंभवडे, कुबलवाडा, कॅम्प कॉर्नर, म्हाडा कॉलनी, रामघाट रोड या भागातील नागरिक शिवसेनेतर्फे करण्यात आलेल्या आवाहनानुसार संफ साधून पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आहेत. त्या त्या ठिकाणी शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश येरम व जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर हे यशस्वी नियोजन करुन युवासेना तालुका प्रमुख संतोष परब यांच्यामार्फत प्रत्यक्ष सहभागातून आवश्यकता असेल तेथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत आहेत.

      गेल्या १ जून पासून शहरात शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना शहरप्रमुख उमेश येरम यशस्वी नियोजन करून मोफत पाणी पुरवठा करत आहेत. वेंगुर्ला शहर शिवसनेतर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल उन्हाळी पाणी टंचाई भागातील नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Close Menu