पुष्कराज कोलेंकडून वचनाची पूर्तता

एसटी डेपो आणि स्थानक यांना व्हिलचेअर प्रदान

     सिधुदुर्ग जिल्ह्यातील अपंगव ज्येष्ठ नागरिक यांना प्रवासातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून सिधुदुर्गातील सर्व एस.टी.डेपोंना व्हिलचेअर देण्याचे वचन समाजसेवक पुष्कराज कोले यांनी दिले होते. श्री.कोले यांनी आपल्या वचनाची पूर्तता करताना कुडाळ, कणकवली, मालवण, दोडामार्ग, देवगड, सावंतवाडी, वैभववाडी या डेपोंसह आंबोली व शिरोडा या बस स्थानकांना मोफत व्हिलचेअरचे वाटप केले आहे.

      हा कार्यक्रम ८ जून रोजी कुडाळ डेपोतील गणेश मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगांव वेस्टचे माजी अध्यक्ष पुष्कराज कोले, कुडाळ आगार व्यवस्थापक संदिप पाटील, राष्ट्रीय अपंग विका महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व सिधुदुर्ग कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, विनायक नवार, संतोष मुणनकर, कार्यालय अधिकारी सुरेंद्र मोरजकर, वहातुक निरिक्षक विवेकानंद गावडे, सहाय्यक वाहतुक निरीक्षक पल्लवी मोर्ये, स्थानक प्रमुख राजाराम राऊळ, वरिष्ठ लिपिक तनया सावंत, वाहतुक नियंत्रक महादेव आंबेसकर, रामचंद्र पालकर, रोहिदास कामत, महासंघाचे प्रतिनिधी संतोश सामंत, हरी परब, प्रणव परब व राजन सावंत यांच्यासह प्रत्येक डेपोचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी वेंगुर्ला डेपोचे सहाय्यक वाहतुक अधिक्षक विशाल शेवाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

      दरवर्षी पुष्कराज कोले व बापू गिरप हे अपंगांचा मेळावा घेऊन त्यांना आवश्यक त्या साहित्याचे वाटप करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला.

 

Leave a Reply

Close Menu