सावली ट्रस्टकडून विजयला डिजिटल पियानो

अफाट बुद्धिमत्तेबरोबरच थक्क करणारी संगीत गुणवत्ता असलेल्या वेंगुर्ला-तुळस येथील विजय तुळसकर या छोट्या मुलाची संगीत क्षेत्रातील वाटचाल सुलभ व्हावी या उद्देशाने त्याच्या गुणवत्तेवर तरुण भारत संवादमधून प्रकाश टाकताच मुंबईतील सावली ट्रस्ट ही संस्था त्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी पुढे आली आहे. या संस्थेने विजयच्या पियानो वादनातील गरज ओळखून त्याला तब्बल ७० हजार रुपयांच्या डिजिटल पियानो उपलब्ध करुन दिला आहे. सावली ट्रस्टचे अध्यक्ष नाना देवधर यनी विजयच्या या संगीत शिक्षणाबरोबरच त्याच्या इतर शिक्षणासाठीही मदतीचा हात पुढे केला आहे. विजयच्या संगीत वाटचालीत काहीही कमी पडणार नाही, याची ग्वाहीही देवधर यांनी संस्थेच्यावतीने तुळसकर कुटुंबियांना दिली.

Leave a Reply

Close Menu