वेंगुर्ला पोलिसांकडून नैसर्गिक आपत्ती बचाव प्रशिक्षण

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मोहिमेंतर्गत वेंगुर्ला बंदर ते मांडवीखाडी मानसीश्वर देवस्थानपर्यंतच्या भागात वेंगुर्ला पोलिस स्टेशनला शासनाकडून पुरविण्यात आलेल्या जेमिनी क्राफ्ट बोटीद्वारे रगीत तालीम घेण्यात आली. बुडणा­या व्यक्तीस लाईफ जॅकेट व बोयाच्या सहाय्याने वाचविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या रंगीत तालमीमध्ये पलिस निरीक्षक अतुल जाधव, पोलिस सुरेश पाटील, योगेश वेंगुर्लेकर, अमर कांडर, पांडुरंग खडपकर, रमेश तावडे, वासुदेव परब आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Close Menu