ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी शामराव काळे

नुकत्याच पार पडलेल्या ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्ल्याच्या सभेत नुतन कार्यकारिणी निवडली. यामध्ये अध्यक्ष-शामराव काळे, सचिव-रमेश पिगुळकर, कार्यवाह-मोहन दाभोलकर, उपकार्यवाह-रामचंद्र घोगळे यांचा समावेश आहे. रा.पां.जोशी यांनी नुतन कार्यकारिणीला शुभेच्छा देत ज्येष्ठ नागरिक संघाला २५ वर्षे पूर्ण झाली असून त्याबद्दल एक स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. यासाठी जाहिरात, लेख देऊन सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री.जोशी यांनी केले. मावळते अध्यक्ष रा.पां.जोशी यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला. आजपर्यंत सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल श्री.जोशी यांनी सर्वांचे आभार मानले. चहा व भोजनाचा खर्च श्री. जोशी यांनी केला.

 

Leave a Reply

Close Menu