गाडीअड्डा ग्रामस्थांतर्फे यशस्वी विद्याथ्र्यांचा सन्मान

        गाडीअड्डा भागातील रहिवासी जे यावर्षी दहावी, बारावी तसेच स्कॉलरशिप परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्याथ्र्यांचा गाडीअड्डा ग्रामस्थ मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
      दहावी उत्तीर्णमध्ये गायत्री मांजरेकर, सायली अत्याळकर, हर्षदा शारबिद्रे, सोनल मांजरेकर, प्रतिक केळजी, बारावी उत्तीर्णमध्ये मयुरी शारबिद्रे, प्रथमेश मांजरेकर, देवांग केरकर, प्रथमेश शारबिद्रे, हिमानी केळजी यांचा तसेच स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये अथर्व मांजरेकर, वेदांत कोरगांवकर, श्रीनिवास मयेकर व परिणिता मयेकर यांचा समावेश आहे. या सर्वांचा सुहास मांजरेकर, प्रसाद कोरगांवकर, संदिप मांजरेकर,  संदिप  केळजी , शेखर मयेकर, भानुदास मांजरेकर, महेश वेंगुर्लेकर, सुनिल मांजरेकर, गजानन शारबिद्रे व श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शालेयपयोगी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम येथील भगवती मंदिरात संपन्न झाला. यावेळी गाडीअड्डा ग्रामस्थ व विद्याथ्र्यांचे पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu