‘गांजले ते गाजले‘ व ‘व्हर्जिन‘ या कादंबरीचे प्रकाशन संपन्न

डिंपल पब्लिकेशनतर्फे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या गांजले ते गाजलेव दशवतारावर पहिले संशोधन केलेले डॉ.अशोक भाईडकर यांच्या व्हर्जिनया मराठी व इंग्रजी कादंबरीचा प्रकाशन समारंभ बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे मिनी नाट्यगृहात ७ जून रोजी संपन्न झाला. यावेळी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील, कवी अशोक बागवे, डॉ.सुनिता चव्हाण, अभिनेते डॉ.गिरीश ओक, प्रमोद पवार, प्रदिप कबरे, अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे, लोकशाही न्यूज चॅनेलचे व्यंकटेश नायडू व अशोक मुळे  उपस्थितीत हाते. गांजले ते गाजलेहे पुस्तक म्हणजे गवाणकर यांच्या प्रकाशित-अप्रकाशित नाटकांमागचा इतिहास उलगडणारा मिश्किल भाषेतील दस्तऐवज आहे. तर अशोक भाईडकर यांनी व्हर्जिनया कादंबरीत कौमार्यभंग ही संकल्पना पुरुषाच्या संदर्भात योजून अतिशय कल्पकतेने कादंबरीचा आलेख उंचावला असल्याचे उद्गार कवी बागवे यांनी काढले. प्रेक्षकांमध्ये बोलक्या बाहुल्याचेजनक रामदास पाध्ये, अपर्णा पाध्ये, ‘गंधाली दिवाळीअंकाचे मधुकर वर्तक, लेखिका नेहा सावंत, डॉ.नंदा मेश्राम, मनीषा रावराणे, चित्रकार अनिल दाभाडे व सौ.दाभाडे, अभिनेते अरूण होर्णेकर, संभाजी कदम, दत्तात्रेय देशमुख, सुरेश ठाकूर, केवल वर्तक, वंदना वर्तक, सुनील आचोलकर,नरेश बंटवालमकरंद सावे, रवी देशमुख, सुनील लांजेकर,अजिंक्य चौलकर, सदा चव्हाण, हेमंत मेस्त्री, प्रदीप तळेकर, कौतुक मुळे व नम्रता मुळे उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu