वारकरी सावळाराम बुवा कुर्ले यांचा सत्कार

आषाढी एकादशीचे औचित्य साधून वेंगुर्ला येथील वारकरी सांप्रदायचे ह.भ.प. सावळाराम बुवा कुर्ले यांचा वेंगुर्ला भाजपातर्फे निवृत्त शिक्षक व साहित्यिक अजित राऊळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर अन्य वारक-यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम चांदेरकर विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला.

      सत्काराला उत्तर देताना कुर्ले बुवांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा व पक्षाचा गौरव केला. तसेच वाकर-यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी विमा छत्र योजनासुरु केल्याबद्द शिदे व फडणवीस सरकारचे आभार व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथे आवर्जून उपस्थित राहून महाराष्ट्रातील वारक-यांच्या कार्याची प्रशंसा केली होती, तर जे का रंगजे गांजलेहा संत तुकारामांचा अभंग पंतप्रधान यांनी मराठीत म्हणून दाखविला होता याची आठवण प्रसन्ना देसाई यांनी करुन दिली. या कार्यक्रमात मोदींच्या नऊ वर्षांच्या कामगिरींचे पत्रक वारक-यांना देण्यात आले. 

      यावेळी भाजपाचे सुहास गवंडळकर, राजन गिरप, बाबली वायंगणकर, श्रेया मयेकर, वृंदा गवंडळकर, रसिका मठकर, आकांक्षा परब, रविद्र शिरसाठ, पुंडलिक हळदणकर, भाऊ केरकर, सुनिल मठकर, राघवेंद्र जोशी, विश्व हिदू परिषदेचे अरुण गोगटे यांच्यासह सहदेव कुर्ले, अनिरुद्ध पेडणेकर, प्रमिला पाटकर, चंद्रभागा मेस्त्री, महानंदा मयेकर, रत्नप्रभा नागवेकर, चंदना कुर्ले, सुप्रिया बांदेकर, सायली मसुरकर, ज्योत्स्ना कुबल, रमाबाई तांडेल, राजन पवार, महेंद्र पालव, गजानन कुबल, दिपाली कुबल, रजनी तारी, मयुरी पालव, विठ्ठल वेंगुर्लेकर, शामा रेवणकर आदी वारकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu