पावलो पंढरी पार नाही सुखा । भेटला हा सखा मायबाप

खांद्यावर भगवी पताकाटाळ मृदुंगाचा गजरमुखात पडुरंगाचे नाव घेत विठ्ठल भक्तांनी वारकरी पेहरावात कालवी बंदर येथील विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. ज्या माऊलीसाठी १८ किलोमिटरचा प्रवास केलात्या माऊलीचे सगुण साकार रुप पाहिल्यानंतर प्रत्येक विठ्ठल भक्ताची स्थिती पावलो पंढरी पार नाही सुखा । भेटला हा सखा मायबाप अशी झाली.

      वै.श्रीकृष्ण ऊर्फ बाबू झांट्ये ह्यांच्या प्रेरणेने वेंगुर्ला ते कालवीबंदर विठ्ठल रखुमाई मंदिर अशी आषाढी पायी वारी गेली तीन वर्षे सुरु आहे. यंदाच्या या चौथ्या वर्षातही विठुरायाच्या आशीर्वादाने पायीवारी निर्विघ्न पार पडली. आज गुरुवारी सकाळी शहरातील दाभोली नाक्यावरुन या पायी वारीला सुरुवात झाली. मार्गामार्गात विठ्ठल नामाचा जयघोष करीत ही वारी दुपारी मंदिरात पोहचली. यावेळी मंदिरातर्फे या पायीवारीचे स्वागत करण्यात आले. पांडुरंगाच्या कृपेने जेवढी वर्षे पायीवारी करणे शक्य आहे तेवढी वर्षे पायीवारी चालू ठेवण्याचा बाबू झांट्ये ह्यांच्या मित्रपरिवारांचा मानस आहे.

Leave a Reply

Close Menu