खर्डेकरच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार

गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या बी.के.सी असोसिएशन या माजी विद्यार्थी संघटनेने खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, स.का.पाटील (मालवण) कॉलेजचे प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, वेंगुर्ल्याचे नूतन तहसिलदार ओंकार ओतारी यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, बी.के.सी.असोसिएशनचे अध्यक्ष सतिश डुबळे, उपाध्यक्ष बाळू खामकर, सचिव संजय पुनाळेकर, खजिनदार दिलीप गिरपमाजी उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, सुरेंद्र चव्हाण, प्रदिप कुबल यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 

      बौद्धिक कौशल्य हे आपल्याला प्रगतीच्या उच्च शिखरावर घेऊन जाते. त्यासाठी प्रगतीचा ध्यास धरला पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर का, कशासाठी, कसा करता याचे आत्मपरिक्षण करावे असे डॉ.शिवराम ठाकूर यांनी सांगितले. कष्टाने, खडतर प्रयत्नाने यश मिळते. सध्याच्या काळात चौफेर ज्ञान आवश्यक आहे. यासाठी विविध क्षेत्रात पारंगत व्हा असा संदेश डॉ.आनंद बांदेकर यांनी दिला. तर गुरूचा आदर करा. चिवटपणाची कास सोडू नका आणि आपली प्रगती करा असे आवाहन ओंकारी ओतारी यांनी केले. सतिश डुबळे, संजय पुनाळेकर, दिलीप गिरप यांनी बी.के.सी.असोसिएशनच्या स्थापनेबद्दल माहिती दिली.  दिलीप गिरप यांना कोकण आयडॉल पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. बी.के.सी.असोसिएशनने महाविद्यालयाच्या विकासात वेळोवेळी हातभार लावून महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल दौलतराव देसाई यांनी असोसिएशनचे आभार मानले.  प्रास्ताविक प्रा.वामन गावडे यांनी तर आभार डॉ.वसंतराव पाटोळे यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu