सुतार समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव

सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम ९ जुलै रोजी झाराप येथील मंडळाच्या कार्यालयात अध्यक्ष शरद मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. उद्घाटन झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यसनमुक्ती तसेच मधुमेह मुक्ती मार्गदर्शक रिया सुतार, उद्योजक सुरेश सुतार, माजी अध्यक्ष आनंद मेस्त्री, मंडळाचे उपाध्यक्ष रितेश सुतार, विजय मेस्त्री, प्रभाकर मेस्त्री, अशोक दाभोलकर-मेस्त्री, पांचाळ गुरूजी आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर व उद्योजक सुरेश सुतार यांनी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच अन्य दात्यांनीही सहकार्य केले. सूत्रसंचालन सचिव राजन पांचाळ यांनी तर आभार अनंत मेस्त्री यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu