श्री रामेश्‍वर सप्ताहाची उत्साहात सांगता

वेंगुर्ला येथील ग्रामदैवत श्रीदेव रामेश्‍वराच्या सुरू असलेल्या प्रसिद्ध अखंड भजनी सप्ताहाची सांगता काल्याच्या पालखीने 11 जुलै रोजी मोठ्या उत्साहात झाली. 4 ते 10 जुलै या कालावधीत पारंपरिक अष्टोप्रहर भजनांसोबतच तालुक्यातील वारकरी व संगीत मंडळांची भजने संपन्न झाली. तर रामेश्‍वर व राम मंदिरात पौराणिक कथांचा प्रसार करणारे देखावेही साकारण्यात आले होते. सप्ताहाचे खास आकर्षण बनलेल्या रांगोळी प्रदर्शनात स्थानिक कलाकारांनी सहभागी होऊन सुबक अशाप्रकारची रांगोळी रेखाटून आपली कला जनमानसात पोहोचवली. या रांगोळी प्रदर्शनात शाळकरी मुलांनीही स्वतःला सहभागी करून घेत ‘तुम्ही दिला वसा, आम्ही चालवू वारसा‘ याची प्रचिती अगदी लहान वयातच दाखूवन दिली. सप्ताहाच्या सातव्या दिवशी सोमवारी रात्री दाभोली नाका, बाजारपेठ, मारूती स्टॉपमार्गे दिंडी रामेश्‍वर मंदिरात आली. 11 रोजी सकाळी काल्याच्या पालखीने सप्ताहाची सांगता झाली. यावेळी बहुसंख्य भाविक उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu