पप्पू परब यांची निवड

वेंगुर्ल्यातील सरपंच व उपसरपंच यांची सभा ९ जुलै रोजी भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत सरपंच व उपसरपंच  संघटना अध्यक्षपदी परबवाडा उपसरपंच पप्पू परब यांची निवड तर उपाध्यक्षपदी अणसूर सरपंच सत्यविजय गावडे व भोगवे सरपंच प्रणिती आंबडपालकर, चिटणिसपदी रेडी सरपंच रामसिंग राणे तर उर्वरित सर्व सरपंच व उपसरपंच यांची सदस्य म्हणून निवड केली. यावेळी प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, समिर कुडाळकर यांच्यासह पदाधिकारी व तालुक्यातील भाजपचे सरपंच उपसरपंच उपस्थित होते.

                       

Leave a Reply

Close Menu