देवदूत बनलेल्या ग्रामस्थांचा सत्कार

मातोंड व होडावडा या गावांना जोडणा-­या पुलाच्या शेजारी आलेल्या पुराच्या पाण्यात एका झाडावर तब्बल ३ तास अडकलेल्या तुळस येथील ३७ वर्षीय तरुणाला २० जुलै रोजी मध्यरात्री मातोंड येथील ग्रामस्थ होमगार्ड समादेशक अधिकारी संतोष विष्णू मातोंडकर, ग्रामस्थ ज्ञानेश्वर मोहिते, कृष्णकांत घोगळे, विशाल घोगळे, अनिकेत जोशी, राहुल प्रभू, गिरीश प्रभू, सौरभ घोगळे, सुहास घोगळे, बाळा मोहिते, नाना मोहिते यांनी बचाव कार्य करत सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या या धाडसाबद्दल तुळस येथील ग्रामस्थ व आर.सी.सी. देऊळवाडा मित्रमंडळ तुळसच्यावतीने त्यांचा जैतीर मंदिरात सत्कार करण्यात आला. यावेळी तुळस देवस्थानचे प्रमुख मानकरी अनिल परब, दिवाकर परब, रमेश परब, यशवंत परब, रामू परब, दादा परब, सातोळी-बावळाट सरपंच सौ. परब, तुळस ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, गुंडू परब, दिलीप परब, मंदार तुळसकर, रमेश कबरे, दिपेश परब, प्रथमेश परब यांच्यासह आर.सी.सी.देऊळवाडा मित्रमंडळाचे सदस्य, सिद्धेश परब व त्याचे कुटुंबिय आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दिपेश परब यांनी केले.

Leave a Reply

Close Menu