पिक विमा योजनेचा लाभ घ्या! – तहसिलदार

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तालुक्यात प्रसारासाठी चित्ररथ दाखल झाला असून त्याचे उद्घाटन तहसिलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते झाले. यावेळी नायब तहसिलदार अभिजित हजारे, कृषी पर्यवेक्षक एस.बी.देसाई, एस.ए.नाईक, कृषी पर्यवेक्षक विश्वनाथ शिवपुरे, तंत्र सहाय्यक राजू गव्हाणे, कृषी सहाय्यक लाडू जाधव, सुरज परब, विमा प्रतिनिधी नयन सावंत उपस्थित होते.

    प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२३साठी तालुक्यातील इच्छुक शेतकर्‍यांनी आपला ७/१२, बँक पासबुक, पीक पेरा स्वयंघोषणापत्र सह सीएससी सेंटर, पिक विमा कंपनीचे पोर्टल किवा पिक विमा अॅपद्वारे नोंदणी करावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांची विमा कंपनी म्हणून निवड केली आहे. तहसिलदार यांच्या समवेत वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी निरंजन देसाई यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन प्रधानमंत्री पिक विमा योजना व ई पीक पाहणी कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. शासनातर्फे भात पिकासाठी नाममात्र १ रुपया किंमतीमध्ये विमा योजना कार्यान्वित केली असून सदर योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. तरी शेतकर्‍यांनी या योजनेचा तत्काळ लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu